Sunday, April 12, 2026

युगत

एक युगत सांगतो, ध्यानात ठेवाचं,
मनातील समदं,‌ओठी येऊ नाही द्याचं...

ह्याचं बी ऐकाचं अन् त्याचं बी ऐकाचं,
जे जे कोणी सांगेल ते समदं ऐकाचं,
जे करायचं मनी पक्क करायचं,
मनातील समदं,‌ओठी येऊ नाही द्याचं...

बीगी बीगी उठू, कामाला लागाचं,
मनातील चित्राचं असं तुकडं तुकडं पाडाचं,
मग एक एक तुकडं कमाया लागाचं,
मनातील समदं,‌ओठी येऊ नाही द्याचं..

(समोरच्याचा)चेहरा हसतो मनी काही बी शिजतं,
एका शब्दाने तुझ्या, मन दुसऱ्याचं कुजतं,
तू सांगाया जातो, स्वप्न आपली म्हणून,
नुसतं ऐकून बी तुझं, त्याचं काळीज जळतं,
पूर्ण तापायच्या आधी दूध असं ते नासतं,
म्हणून मनातील समदं,‌ओठी येऊ नाही द्याचं...

------ विभव जोगळेकर

No comments:

Post a Comment

युगत

एक युगत सांगतो, ध्यानात ठेवाचं, मनातील समदं,‌ओठी येऊ नाही द्याचं... ह्याचं बी ऐकाचं अन् त्याचं बी ऐकाचं, जे जे कोणी सांगेल ते समदं ऐकाचं, जे...