A small, sweet and romantic poem of memories of a lover with his girlfriend; an evening on a beach...hope you guys like it... do leave your comments, these will inspire me to write more for sure...
आणि मग उगाचच लाटांनी किनाऱ्यावरच रेंगाळणं ;
त्यावर तुझं ते रुसणं , आणि माझं हसणं , अजूनही माझ्या लक्षात आहे ,
समुद्रावरची ती संध्याकाळ अजूनही माझ्या लक्षात आहे || १ ||
मावळणारा सूर्य जणू आपला निरोप घेत होता ,
मंद वाहणारा वारा तुझ्या बटांशी खेळत होता ,
त्यावर तूझं ते रुसणं आणि माझं हसणं ;अजूनही माझ्या लक्षात आहे ,
समुद्रावरची ती संध्याकाळ अजूनही माझ्या लक्षात आहे || २ ||
समुद्रावरच्या गर्दीतही आपण दोघे एकांतात होतो ,
गुंतवूनी हातात हात , प्रेमाची स्वप्ने रंगवत होतो ,
तुझा तो स्पर्श , आपली स्वप्ने , अजूनही माझ्या लक्षात आहे ,
समुद्रावरची ती संध्याकाळ अजूनही माझ्या लक्षात आहे || ३ ||
संध्याकाळ सरत होती , तुझी तगमग वाढत होती ,
माझ्यापासून लांब जाण्याचा त्रास , नि घरी जाण्याची तुला घाई होती ,
तुझ्या चेहऱ्यावरचा तो गोंधळ अजूनही माझ्या लक्षात आहे ,
समुद्रावरची ती संध्याकाळ अजूनही माझ्या लक्षात आहे || ४ ||

No comments:
Post a Comment