Tuesday, July 12, 2016

मी माझी ना राहिले...

साज करून बसले, साडी लेऊन बसले, 
तुझ्या वाटेकडे सख्या डोळे लावून बसले.   ।।१।।

ओल पावसाची अंगणी, हर्ष दाटला हा मनी,
वेड्या मनास तुझी लय लावून बसले.     ।।२।।

तुझी चाहूल लागली, प्रीत मनी ह्या खुलली, 
तुला पाहुनीया द्वारी, मी माझी ना राहिले.   ।।३।।

साठवे तुझे रूप नयनी, शब्द गुंजतात कानी, 
तुझ्या श्वासात मी श्वास होऊन राहिले.  ।।४।।

तू घेता मिठीत, अश्रू दाटले नयनी, 
मी माझी ना राहता, तुझी होऊन राहिले.  ।।५।।

No comments:

Post a Comment

नको कोणाला सांगू...

काय कुठे कधी कसे झाले सांग मला, कोण कोणाला कधी काय बोलले सांग मला, त्या बातमीला तिखट मीठ लावायचे मला, "नको कोणाला सांगू" म्हणत सर्...