Tuesday, January 12, 2016

साजणा


वेळ पहाटेची होती, हाक कोकीळेची होती,
शहारले अंग माझे, मिठी साजणाची होती  - १

दव पानावरी विसावले, चिंब माझे मन झाले,
प्रीतीत न्हाउन  निघाले, प्रीत साजणाची होती  - २

मंद वाऱ्याची झुळूक, संगे पारिजाताचा सुगंध,
हलकेच साद आली, साद साजणाची होती  - ३

नववधू मी लाजले, त्याच्या मिठीत शिरले,
आता ही साजणी, माझ्या साजणाची होती  - ४

No comments:

Post a Comment

नको कोणाला सांगू...

काय कुठे कधी कसे झाले सांग मला, कोण कोणाला कधी काय बोलले सांग मला, त्या बातमीला तिखट मीठ लावायचे मला, "नको कोणाला सांगू" म्हणत सर्...