Friday, December 26, 2014

अंतिम सत्य

तो समोर निपचिप पडला होता, श्वास थांबलेला,
आयुष्याचं अंतिम सत्य अनुभवून, सत्यापलीकडे गेलेला… 

नातेवाइक सारे कसे ओक्साबोक्शी रडत होते,
जमलेले लोक सारे, दु:खात त्यांच्या सहभागी होत होते,
आनंद, प्रेम, सु:ख दुखांच्या पलीकडे तो पोचलेला,
आयुष्याचं अंतिम सत्य अनुभवून, सत्यापलीकडे गेलेला… ।।१।।

आयुष्यात त्याने काय कमावलं, काय गमावलं, कळलं नाही,
अतृप्त राहिल्या इच्छा काही, पिंडाला कावळा शिवला नाही,
अर्ध्यावर संसाराचा डाव मोडून तो, अनंतात विलीन झालेला,
आयुष्याचं अंतिम सत्य अनुभवून, सत्यापलीकडे गेलेला… ।।२।।

प्रत्यक्ष नसला तरी आठवणीत आहे तो आता,
कधी मागच्या पडवीत झोपाळ्यावर अभंग गाणारा,
कधी शेतात रमलेला तर, कधी पान खाउन स्वतात रममाण झालेला,
आता आयुष्याचं अंतिम सत्य अनुभवून, सत्यापलीकडे गेलेला… ।।३।।

No comments:

Post a Comment

प्रार्थना

जन्मोजन्मीचे वाहून ओझे, थकलो आता "आई" गं, आवराया हा सारा पसारा, मार्ग आता तू दावी गं... संचित बहू कर्माचे हे, नित्य भर त्यात पडते ...