सांगायचं राहूनच गेलं, सखे तुला मनातलं,
ओठांवरती येउन सुद्धा , ओठातच राहिलेलं |
रेखा उमटल्या प्रेमाच्या, भावनांचे रंग भरले,
मनातले चित्र कसे, अलगद उमटत गेले,
जे व्यक्त व्हायचं होतं, ते मात्र राहूनच गेलं,
पूर्ण होऊनही हे चित्र, थोडसं अपुरच राहिलं,
सांगायचं राहूनच गेलं, सखे तुला मनातलं,
ओठांवरती येउन सुद्धा , ओठातच राहिलेलं || १ ||
कधी तरी होईल पूर्ण, चित्र माझ्या मनातलं,
कधी तरी कळेल तुला,प्रेम माझ्या मनातलं,
तेंव्हा म्हणेन सखे जे, सांगायचं ते सांगून झालं,
ओठांवरती राहिलेलं, डोळ्यातुनी व्यक्त झालं ,
जरा थांब, समजून घे, येउदे ऋतू वसंताचा,
दाही दिशा पसरून जाईल, सुगंध आपल्या प्रेमाचा|| 2 ||
No comments:
Post a Comment