Thursday, June 13, 2013

शाळा अशी हवी

दप्तराचे ओझे नको,
छ्डीवाले शिक्षक नको,
शाळा अशी हवी जिथे,
परीक्षेचं टेन्शन नको ॥ 

शाळेच्या पहिल्याच दिवशी,
अभ्यास होमवर्क काहीच नको,
अर्ध्या दिवसाहून मोठा,
शाळेचा पहिला दिवस नको,
नव्या कोऱ्या वहिचा,
वास कधी संपायला नको,
शाळा अशी हवी जिथे,
परीक्षेचं टेन्शन नको ॥ १ ॥ 

नवीन मित्र शाळेत येताना,
जुने सोडून जायला नको,
अभ्यास कितीही वाढला तरी,
दंगा मस्ती कमी व्हायला नको,
तासामध्ये डबा चोरून खाताना,
शिक्षकांनी पकडायला नको,
शाळा अशी हवी जिथे,
परीक्षेचं टेन्शन नको ॥ २ ॥ 

Wednesday, May 8, 2013

प्रेम …

हे तुझं, ते माझं, कधी आपलं झालं कळलंच नाही,
प्रेमाच्या आपल्या संसाराला, चार वर्ष झाली कळलीच नाही ॥ 

चारच दिवसांपूर्वी तर भेटलो आपण,
लग्न केलं, प्रेमात पडलो,
कि प्रेमात पडून लग्न केलं,
अजूनही मला उमगत नाही …. 
प्रेमाच्या आपल्या संसाराला, चार वर्ष झाली कळलीच नाही ॥ 

चारच पाउलं तर चाललो आपण,
दोन धडपडण्याची, नि दोन पाउलं प्रेमाची होती,
तुझयासंगे ही चार पाउलं,
कधी चाललो कळलंच नाहि …
प्रेमाच्या आपल्या संसाराला, चार वर्ष झाली कळलीच नाही ॥ 

चारच क्षण तर जगलोय आपण,
एक क्षण दुख्खाचा, तर तीन क्षण प्रेमाचे होते,
यापुढील प्रत्येक क्षण प्रेमाचाच असेल शंकाच नाही …. 
प्रेमाच्या आपल्या संसाराला, चार वर्ष झाली कळलीच नाही ॥ 

Thursday, April 18, 2013

ऐ इन्सान जाग जरा


ऐ इन्सान जाग जरा, आवाज दे,
हवस के दरिन्दोसे लडने में साथ दे । 

माना के चूप रहना तेरी दुर्बलता का प्रतिक नही,
पर उन दरिन्दो के नजरो में, तेरी हार से कम नही । 
दुर्बल महिलाओन्के अत्याचारी कायर है, शूर नही,
पर उनके साहस की वजह, अपनेही जीवन में तू मगरूर कही । 

आज नही तो कल ये दुर्घटना, तेरे घर भी हो सकती है,
हर रोज कही किसीके  बेटीकी इज्जत जहा लुटती है  । 
तू अकेला नही इस राह में, हर वो शक्स तेरे साथ है,
जिसे अपने परीवारसे प्यार और अपने जिम्मेदारी का एहसास है । 

ऐ इन्सान जाग जरा, आवाज दे,
हवस के दरिन्दोसे लडने में साथ दे… 

Thursday, September 20, 2012

कविता

कविता ही प्रतिभा असते, कवी म्हणवणाऱ्या लोकांची,
शब्दांचा काव्य बनतं, ही देणगी आहे देवाची|

आयुष्याला अर्थ देते, देते दिशा जगण्याला,
लंगड्यालाही पाय देते, आयुष्याच्या शर्यतीत धावायला|

देते दृष्टी कवीला, सूर्याच्या पलीकडे पहायला,
शिकविते रडता रडता हसायला, आणि हसत हसत दुख भोगायला|

कधी काव्य असतं पावसाचं, प्रेमाच्या धारांनी मन चिंब भिजवणार,
कधी काव्य असतं पावसाचं, मनातलं दुख डोळ्यावाटे पूर म्हणून वाहणारं|

कविता ही अशीच असते, आयुष्यावर बोलणारी, 
शब्दांच्या माध्यामातून, मुक्यालाही बोलायला लावणारी|

Sunday, September 9, 2012

खट्याळ....

खट्याळ वारा...
अलगद अलगुज वाजवीत जातो, 
मनातील गुज तुला सांगून जातो....खट्याळ वारा....|

खट्याळ पाउस...
प्रेमाच्या धारा बरसत जातो,
भावनांनी चिंब भिजवून जातो....खट्याळ पाउस ...|

खट्याळ हसणं.....
मनास वेड लाऊन जातं,
जीवाची घालमेल वाढवून जातं....खट्याळ हसणं.....|

Saturday, July 14, 2012

सखे ग.....

सांगायचं राहूनच गेलं, सखे तुला मनातलं, 
ओठांवरती येउन सुद्धा , ओठातच राहिलेलं |

रेखा उमटल्या प्रेमाच्या, भावनांचे रंग भरले, 
मनातले चित्र कसे, अलगद उमटत गेले,
जे व्यक्त व्हायचं होतं, ते मात्र राहूनच गेलं,
पूर्ण होऊनही हे चित्र, थोडसं अपुरच राहिलं,
सांगायचं राहूनच गेलं, सखे तुला मनातलं, 
ओठांवरती येउन सुद्धा , ओठातच राहिलेलं || १ ||

कधी तरी होईल पूर्ण, चित्र माझ्या मनातलं,
कधी तरी कळेल तुला,प्रेम माझ्या मनातलं,
तेंव्हा म्हणेन सखे जे, सांगायचं ते सांगू झालं,
ओठांवरती राहिलेलं, डोळ्यातुनी व्यक्त झालं ,
जरा थांब, समजून घे, येउदे ऋतू वसंताचा,
दाही दिशा पसरून जाईल, सुगंध आपल्या प्रेमाचा|| 2 ||

Tuesday, July 10, 2012

ती संध्याकाळ .............

A small, sweet and romantic poem of memories of a lover with his girlfriend; an evening on a beach...hope you guys like it... do leave your  comments, these will inspire me to write more for sure...


किनाऱ्यावरच्या आपल्या पाऊलखुणा लाटांनी पुसून टाकणं ;

आणि मग उगाचच लाटांनी किनाऱ्यावरच  रेंगाळणं ;
त्यावर तुझं ते रुसणं , आणि माझं हसणं , अजूनही माझ्या लक्षात आहे ,
समुद्रावरची ती संध्याकाळ अजूनही माझ्या लक्षात आहे  || १  ||

मावळणारा सूर्य जणू आपला निरोप  घेत होता ,
मंद वाहणारा वारा तुझ्या बटांशी खेळत होता ,
त्यावर तूझं ते रुसणं आणि माझं हसणं ;अजूनही माझ्या लक्षात आहे ,
समुद्रावरची ती संध्याकाळ अजूनही माझ्या लक्षात आहे  || २  ||

समुद्रावरच्या गर्दीतही आपण दोघे एकांतात होतो ,
गुंतवूनी हातात हात , प्रेमाची स्वप्ने रंगवत होतो ,
तुझा तो स्पर्श , आपली स्वप्ने , अजूनही माझ्या लक्षात आहे , 
समुद्रावरची ती संध्याकाळ अजूनही माझ्या लक्षात आहे  || ३  ||

संध्याकाळ सरत होती , तुझी तगमग वाढत होती ,
माझ्यापासून लांब जाण्याचा त्रास , नि घरी जाण्याची तुला घाई होती ,
तुझ्या चेहऱ्यावरचा तो गोंधळ अजूनही माझ्या लक्षात आहे ,
समुद्रावरची ती संध्याकाळ अजूनही माझ्या लक्षात आहे  ||  ४  ||

सूर्यास्त - २

सूर्य अस्ताला निघाला, खेळ लाटांचा मंदावला, का अशावेळी खुणावते, अनामिक ओढ ही मनाला... ओढ अशी ही लागते, मन बेचैन असे हे होते, जसे ओळखीचे कोणी,...