Thursday, February 19, 2026
सूर्यास्त - २
Wednesday, February 18, 2026
सूर्यास्त
Sunday, February 1, 2026
रायाची अंतुरी
कावरी ग बावरी,
प्रीत माझी तुझ्यावरी,
या रायाची तू अंतुरी ||
कधी अवस कधी पौर्णिमा,
परी साथ कधी सोडेना,
धरतीच्या सोबतीला,
सदा नभी चंद्रमा,
त्याच परी तुझ्या संगे
राहीन मी सुंदरी...
प्रीत माझी तुझ्यावरी,
या रायाची तू अंतुरी ||१||
तूच माझ्या मनामध्ये,
तूच ग श्वासा मंदी,
तुझ्याविना गुंतणार,
कुठे ही ना, हा गाडी,
येऊ दे ग हसू आता,
गुलाबी ओठांवरी...
प्रीत माझी तुझ्यावरी,
या रायाची तू अंतुरी ||२||
नको नजर चुकवू,
नको खेळू तुझ्या बटांशी,
काय तुझ्या मनात आता,
कळू दे या वेड्यासी,
नकार वा होकार जरी,
तूच माझी अंतुरी....
प्रीत माझी तुझ्यावरी,
या रायाची तू अंतुरी ||३||
दिवे लागणीला सख्या,
वाट तुझीच पाहते,
स्वप्न एकच पाहते मी,
तुझ्या घरी नांदते,
व्यापिले आयुष्य तूच,
आता सहावेना ही दुरी,
प्रीत माझी तुझ्यावरी,
Friday, January 30, 2026
नैहर छुटो जाय...
पश्चिमेला तुळस ग, बसली वृंदावनी,
बाजूलाच जास्वंद, बहरून ती आली,
त्यापलीकडे लगडली, वेलावर गोकर्णी... ||१||
अशा फुलांच्या मधोमध, पसरले अंगण,
अंगणात मांडले ग, झावळांचे तोरण,
पाखडलेल्या तांदळाचा, पसारा ग अंगणी,
वेचाया जमली चिऊ-खारू, जमले ग सारेजण...||२||
समोरच्या झाडीतून, किरणे डोकावती,
भारद्वाजाची साद मग, मनास खुणावती,
तेवढ्यात गोठ्यातून, गंगा ही हांबरती,
पिल्लास तिच्या दूध पाजाया, साद ती घालती...||३||
परसात विहिरीवर, आई रहाट ओढती,
अन् आजी माझी चुलीवर, भाकरी ग भाजती,
बाबा लागले तयारीला, शेतावर लावणी,
मी आणि मोती आमचा, दोघे त्यांचे सोबती...||४||
वैभव हे सारे इथे, कसे सोडून मी जाऊ,
सांग सख्या तुझ्या सांगे, कशी शहराला येऊ,
जन्म माझा मातीतला, जीव गुंतला ह्या अंगणी,
पश्चिमेला जिथे आहे, तुळस वृंदावनी... ||५||
---- विभव जोगळेकर
Sunday, January 25, 2026
क्या बताउ तुम्हे
Tuesday, January 20, 2026
आई - बाबा
आता सहावेना, ऐसे नियतीचे हे आघात ||
गाडा संसाराचा ओढून, चिंता भविष्याची करून,
थकली ग माझी माय, गेली झिजून झिजून,
शरीर थकले, उभे आयुष्य कष्टात जगून,
परी मन ना थकले, चिंता लेकरांची करून,
शेवटी थांबले ते श्वास, काही राहिले ना शेष,
गेली समर्थपणे देऊन, बाबांची ४७ वर्षांची साथ || १||
बाबांविषयी काय लिहू, मला शब्दचीं सूचेना,
त्यांच्या बद्दलच्या भावना, शब्दात मांडता येईना,
बाबा शीतल छाया झाले, जेव्हा आयुष्य तापून उठले,
बाबा मजबूत ढाल झाले, जेव्हा संकट समोर ठाकले,
राग खोट्याचा फार त्यांना, व्रत सत्याचे घेतलेले,
संस्कार मुलांवर करताना, हात कधीच ना उठले ||२||
शिक्षण नोकरी परी घर, लहानपणीच सोडले,
परी शेवटच्या श्वासापर्यंत, हेदवीचे होऊन राहिले,
चांगुलपणा नी प्रामाणिकपणाचे, बाळकडू त्यांनीच पाजले,
आईची संसारात साथ करताना, प्रेम काय ते दाविले,
संसार करताना, अध्यात्माची, कास कधी सोडली नाही,
सद्गुरू सेवेच त्यांनी, व्रत कधी मोडलं नाही || ३ ||
सुटली साथ आईची, एकाकी पडले ते फार,
कितीही म्हटलं तरी, त्या दोघांचा होता तो संसार,
मुलांच्या मायेपोटी, थांबले ते एक संवत्सर,
अन् निरोपाची वेळ येता, त्यागले त्यांनी हे शरीर,
नुसतेच बाबा गेले नाही, गेले माझे मित्र, माझे सल्लागार,
आम्हा करून पोरके, गेले उरकून त्यांचा संसार,
आता सहावेना, ऐसे नियतीचे हे आघात ||४||
---- विभव जोगळेकर
Sunday, January 18, 2026
अबोली
Monday, January 12, 2026
करम
Wednesday, January 7, 2026
इडली आणि रविवार
Friday, January 2, 2026
First Meet
Our parents talked, the dates were fixed,
They smiled and said, "You both can meet"
We sat there, tea growing cold,
Two quiet hearts, a little scared, a little bold.!!
She spoke less, nodded more,
Eyes tracing patterns on the floor.
I tried some jokes, kept my voice light,
Hoping somehow it could feel right.
Between "yes" and "we will see",
Something waited silently!!
It was only our first meeting, thats all,
No big words, no promises to call,
Just two people, careful and slow,
Learning what the hearts should know!!
I asked her, "Shall we go outside?"
The lake was calm, the day was kind,
A small boat and the water moving slow,
Just like us, not ready - but willing though!!
She spoke of home, of simple dreams,
I listened more than I believed.
Her laughter came, shy and true,
And somehow, mine followed too.
The silence did'nt feel so tight,
It felt like things were turning right!!
It was only our first meeting you see,
But felt liek start of something meant to be.
No rush and no need to impress,
Just comfort growing and nothing less!!
When my hand touched hers by chance,
She frozed for a second, then gave a glance,
I held it gently, not too tight,
Like asking a question, not claiming a right!!
A small kiss on her forehead then,
Not love - just respect back then.
She smiled softly, looked away,
And I knew I would remember the day!
It was only our first meeting, so small,
But it changed the meaning of it all.
Not a filmy story, not too grand,
Just a begining....hand in hand.
Arranged by words,chosed by heart,
That's how our story choose to start!!
------ Vibhav Joglekar
सूर्यास्त - २
सूर्य अस्ताला निघाला, खेळ लाटांचा मंदावला, का अशावेळी खुणावते, अनामिक ओढ ही मनाला... ओढ अशी ही लागते, मन बेचैन असे हे होते, जसे ओळखीचे कोणी,...
-
का जाऊ पंढरीला, विठूरायाच्या दर्शना, विठू सदा माझ्या संगे, का तुम्हास दिसेना? विठू माझा, शेतामंदी, राबतोया दिसभर, शेताच ओझं माझ्या, माऊलीच्य...
-
ती लाजून पाठमोरी, चोरून अंग बसलेली, संकेत मिलनाचा, सांगे केशातली अबोली... एक याम रजनीचा, उलटून असा गेलेला, प्रत्येक सरत्या क्षणाला, श्वास...
-
"शेकू शिंदे" , ह्या माणसाची माझी ओळख पहिल्यांदा झाली २०१९ मध्ये, जेंव्हा आम्ही गृह प्रवेश करून स्वतः च्या घरात रहायला आलो. वारकरी ...