Monday, October 30, 2017

जगणे

जगणे साधे विसरुन गेलो,
हसणे सारे हरवून गेलो,
जगता जगता या जगण्याचे,
कारण मी विसरुन गेलो || धृ ||
संसार हा मृगजळ परी,
संसारात मी गुंतून गेलो,
काय कमविले, काय गमविले,
हिशोब सारा विसरून गेलो ।। १ ।।
स्वप्न माझे ज्या वाटेवर,
त्या वाटेवर निघून गेलो,
ज्या वाटेवर माझी माणसं,
त्या वाटा मी विसरून गेलो ।। २ ।।
किती चाललो मला ना कळले,
कळले मला मी थकून गेलो,
स्वप्नांच्या वाटेवर मागे,
वळून पाहणे विसरून गेलो ।। ३।।
              - विभव जोगळेकर


Sunday, April 2, 2017

दुःख

डोळ्यातील पाणी , ऐसे आटले गं,
दुःख वाटेना एवढे, दुःख सोसले  गं ॥ 
काटेरी वाटा, अनवाणी चाल, 
अश्रुंच्या धारानी, शमली तहान,
एकदा भाकर, एवढेच चोचले गं ,
दुःख वाटेना एवढे, दुःख सोसले गं ॥ १।।
परक्यांचे घाव, झेलले शौर्याने ,
घायाळ केले, अपुल्यांच्या शब्दांनी,
नियतीच्या थट्टेवर सर्वा, हसू आले गं ,
दुःख वाटेना एवढे, दुःख सोसले गं ॥ २।।

Friday, January 27, 2017

प्रेमाची ही जादूगीरी

कधी तू येशी स्वप्नामध्ये, कधी बसलेली शेजारी,
तूझ्यात माझा जीव गुंतला, प्रेमाची ही जादूगीरी. || धृ||


श्वास तू,  विश्वास तू, प्रेमाचा एहसास तू, 
कातरवेळी निळ्या आकाशी, रंगांची बरसात तू, 
रंगात तूझ्या मी रंगून गेलो,  प्रेमाची किमया सारी,
तूझ्यात माझा जीव गुंतला,  प्रेमाची ही जादूगीरी  || 1||


कधी तू अल्लड,  अवखळ,  चंचल, 
कधी निरागस,  नाजूक,  कोमल, 
तूझ्यासारखी एकच तू, जगी न कोणी तूझ्यापरी,
तूझ्यात माझा जीव गुंतला, प्रेमाची ही जादूगीरी || 2 ||

परतीचा प्रवास

आता घ्यावा शेवटचा श्वास,
सूरू परतीचा प्रवास, 
मनाला खुणावते, 
आता पल्ल्याडची वाट | 


पाप-पुण्याचे आरसे, 
कसे समोर ठाकले,
बंधन देहाचे,
जड वाटू लागले,
नको संसाराचा थाट,
आला जगण्याचा वीट,
मनाला खुणावते,

आता पल्ल्याडची वाट ||1||

आले सखे सोयरे सारे,
दावया वाट पैलतीर,
वेळ नाही आली अजून,
काळ राहीला थोडा दूर,
रीते नाही झाले अजुनी,
भोगाचे हे ताट,
मनाला खुणावते,
आता पल्ल्याडची वाट ||2||

तू कौन है

तू कौन है, तेरा वजूद क्या,
इस बात पे तू गौर कर,
ये तन तेरा, तू 'तन' नहीं,
इस बात पे तू गौर कर || 1 ||

ये सोच तेरी, ये कर्म तेरा,
ये रह जायेंगे तू नहीं,
पीछे क्या छोड जाना है,
इस बात पे तू गौर कर || 2 ||

नफरत नहीं, तू प्यार कर,
सबको तू अपनासा कर,
प्यारी यादों को छोड जाना है,
इस बात पे तू गौर कर || 3||

तू सांस है, ये तन नहीं,
इन सासोंकी पूजा तू कर,
तू सब में है, सब तूझमें समाये,
इस बात पे तू गौर कर || 4 ||

बिरहा की रैना

बिरहा की रैना, मन को ना चैना,
तेरे बिन सजना, अब नहीं रहना।

कानोमें गुंजती है, तेरी बतीयाॅ,
दिल को लुभाती है, तेरी अखीयाॅ,
मन करे, आके तेरे, बाहोमें मीट जाना,
बिरहा कीरैना....(1)

बेरहम वक्त ये, थम सा गया है,
तनहाई मुझपे, लीपट सी गयी है,
मन चाहे, तेरी होकर, तुझमें समाना,
बिरहा की रैना....(2)

साज श्रृंगार कर, बैठी सजनीयाँ,
तेरी राह ताके, मेरी नजरीयाँ,
आजा पीया, अब मुझे, जुदाई सहेना।
बिरहा की रैना....(3)

Wednesday, August 24, 2016

देव विटाळला

तूम्ही होता लोकमान्य, 
परी आम्ही लोक सामान्य, 
तुमचा विचार विसरून गेलो, 
आम्ही नशेत हरवून गेलो ॥
गणपतीत एकत्र जमतो आम्ही, 

ओली पार्टी कराया नामी,
गणपतीची नाही आम्हा चाड,
पेटीत आम्हा दिसते घबाड,
तूम्ही होता लोकमान्य. .... ॥1॥
गणपती सार्वजनिक तूम्ही केला,
आम्हा एकत्र आणायला,
आम्ही गल्ली गल्लीत भांडू लागलो,
हातापाईवर ऊतरून आलो,
तूम्ही होता लोकमान्य. .. ॥ 2 ॥
गणपती जूगाराचा अड्डा बनला,
गर्दी झाली तमाशाच्या फडाला,
सार्वजनिक देव हा विटाळला,
नाही राहिले भान आम्हाला,
तूम्ही होता लोकमान्य,
परी आम्ही लोक सामान्य,
तुमचा विचार विसरून गेलो,
आम्ही नशेत हरवून गेलो ॥ 3 ॥

सूर्यास्त - २

सूर्य अस्ताला निघाला, खेळ लाटांचा मंदावला, का अशावेळी खुणावते, अनामिक ओढ ही मनाला... ओढ अशी ही लागते, मन बेचैन असे हे होते, जसे ओळखीचे कोणी,...