मसाला डोसा हा तसा सहज आणि कुठेही मिळणारा पदार्थ. दक्षिण भारतातून जगभर प्रसिद्द झालेला. हल्ली तर मुंबई पुण्यात प्रत्येक नाक्यावर डोस्याची गाडी बघायला मिळते. आमच्या लहानपणी असं नव्हतं. मला वाटतं जी गोष्ट आपल्याला सहज नाही मिळत, त्या गोष्टीच आपल्याला कुतूहल असतं, तसंच काहीसं डोस्याच्या बाबतीत झालं. आमच्या लाहानपाणी, आता सारखं सर्रास हॉटेलला जाणं होत नसे. आम्ही तर वर्षातनं एकदाच जायचो हॉटेलला त्यामुळे डोसा हा एरव्ही घरी न बनणारा पदार्थ, हॉटेल मध्ये अगदी आवडीने खायचो. त्यामुळेच असेल, डोस्याच माझ्या मनात एक स्पेशल स्थान आहे.
गोव्यात डिसेम्बर महिन्यात, ३ तारखेला Old Goa येथे आणि ८ तारखेला पणजी येथे फेस्त असतं. ७ तारखेला, चर्च स्क्वेर, पणजी येथे फटाक्यांची आताषबाजी असते. ती आताषबाजी बघायला आई बाबा आम्हाला दर वर्षी पणजीला घेऊन जायचे, ज्याची आम्ही आतुरतेने वाट बघायचो.
आम्ही रहायचो पर्वरीला, टेकडीवरती. पर्वरी - पणजीला जोडणारा, मांडवी नदीवरचा पूल पडल्यामुळे, वाहतूक बेती मार्गे (आतच Betim), फेरीबोटने पणजीला वळवली होती. ७ तारखेला, संध्याकाळी, ४ वाजता सगळं आटोपून आम्ही तयार व्हायचो. बाबांची त्या वेळी विजय सुपर ही स्कुटर होती. ह्या स्कुटरवरती आम्ही ५ जण स्वार व्हायचो. बाबा स्कुटर चालवायचे, माझा लहान भाऊ, विनय पुढे उभा रहायचा, आई मागच्या सीटवर, आमच्या लहान बहिणीला, वैष्णवीला घेऊन बसायची आणि दोन सीटच्या मध्ये मी !!
पर्वरीहुन बेतीचा प्रवास म्हणजे १०-१५ मिनिटं, मस्त डोंगरातून खाली उतरण्याचा, बाजूला दाट झाडी. बेतीला आलो, कि बाबा स्कुटर पार्क करायचे आणि आईने तो पर्यंत तिकीट काढायचे. मग आम्ही धक्क्यावर फेरीबोटची वाट बघत उभे असायचो. एखादा शेंगदाणेवाला आला कि आम्ही बाबांकडे बघायचो. १ रुपयाला १ पूडी ह्या प्रमाणे २-३ पुड्या घेऊन आम्ही फेरीबोटीत चढायचो.
बोटीच्या मागच्या बाजूला उभे राहून पाणी कापत जाणारी बोट बघण्यात कधी पणजी यायच कळायच नाही. पणजी धक्का ते चर्च स्क्वेर मग पायपीट करून, एक चांगली जागा पकडायची, जिथून आम्हाला पूर्ण आताषबाजी दिसेल. मग वाट बघायची ती काळोख पडण्याची. तो पर्यंत एखाद दुसऱ्या खेळण्याची आणि आमच्या आवडत्या भिरभिऱ्याची खरेदी व्हायची. काळोख झाला कि २५-३० मिनिटं फटाक्यांची आताषबाजी चालायची. एखादं आईस्क्रीम, उरलेले शेंगदाणे खात आताषबाजी बघायची म्हणजे पर्वणी असायची. जात धर्म विसरून सगळे लोकं रस्त्यावर आताषबाजीचा आनंद घ्यायचे!!
ही आताषबाजी झाली कि आमची पावलं वळायची ती जवळच्या कामत हॉटेलमध्ये. तिथे गेलो कि एकच ऑर्डर असायची, मसाला डोसा. मी, विनय आणि वैष्णवी, प्रत्येकी एक डोसा खायचो. आईबाबांनी स्वतःला कधी काही ऑर्डर केलेलं मला तरी आठवत नाही. ते फक्त चहा प्यायचे आणि आम्ही डोस्यावर ताव मारायचो. डोसा खाऊन झालं कि २ Gold Spotची ऑर्डर असायची. ते संपलं कि आमची सहल संपायची आणि आम्ही निघायचो परतीच्या प्रवासाला.
आज पण डोसा म्हटलं कि मला ७-डिसेंबरची आठवण येते. विजय सुपरवरची आमची राईड आणि कामत हॉटेल मधला, मसाला डोसा!!