Wednesday, August 24, 2016

देव विटाळला

तूम्ही होता लोकमान्य, 
परी आम्ही लोक सामान्य, 
तुमचा विचार विसरून गेलो, 
आम्ही नशेत हरवून गेलो ॥
गणपतीत एकत्र जमतो आम्ही, 

ओली पार्टी कराया नामी,
गणपतीची नाही आम्हा चाड,
पेटीत आम्हा दिसते घबाड,
तूम्ही होता लोकमान्य. .... ॥1॥
गणपती सार्वजनिक तूम्ही केला,
आम्हा एकत्र आणायला,
आम्ही गल्ली गल्लीत भांडू लागलो,
हातापाईवर ऊतरून आलो,
तूम्ही होता लोकमान्य. .. ॥ 2 ॥
गणपती जूगाराचा अड्डा बनला,
गर्दी झाली तमाशाच्या फडाला,
सार्वजनिक देव हा विटाळला,
नाही राहिले भान आम्हाला,
तूम्ही होता लोकमान्य,
परी आम्ही लोक सामान्य,
तुमचा विचार विसरून गेलो,
आम्ही नशेत हरवून गेलो ॥ 3 ॥

रात्र पौर्णिमेची

रात्र पौर्णिमेची, चंद्र सोबतीला,
मी एकटा किनाती, सांगे समुद्र खवळलेला ।।
थैमान लाटांचे, उद्रेक विचारांचे,
मन चंद्राची सावली, खड्डे वेदनांचे, ।।
पाय रुतले वाळूत, मन स्थिरावेना,
पुसून टाकिल्या लाटांनी, तरी शोधी पाऊलखुणा ।।
पौर्णिमेच्या चांदण्यात, न्हाऊन निघाला किनारा,
ओल्या किनारी बसून, मी अजून तहानलेला ।।
समुद्राची गाज, तो एकच आवाज,
अशा एकांतात, मन घाली साद ।।

मन

मन आरसा तुझे, दिसे प्रतिबिंब माझे,
राग, स्वार्थ, गुपितं, वचन, आता, सहावेना ओझे,
तुझ्या प्रेमाचा तो कप्पा, कुठे कोपर्यात गेला,
अपेक्षा, स्वपनांच्या धुक्यात, कुठे दिसेनासा झाला,
कप्पा जबाबदारींचा, दिल्या वचनांचा कप्पा,
कप्पा काळाच्या गोष्टींचा, नि उद्याचाहीए कप्पा,
कप्प्या कप्प्याच्या जंगलात, तुला हरवून बसलो,
श्वास चालूच राहिले, जगणं विसरून गेलो,
मन आरसा तुझे, दिसे प्रतिबिंब माझे,
कप्प्या कप्प्याच्या मनाचे, आता सहावेना ओझे. 

संसार

तो संसाराचा राजा, ती त्याच्या मनाची राणी,
दोघांच्या संसाराची, छोटीशी ही कहाणी ।।
तो कामावरती जाणार, घरीही पैका आणून देणार,
त्या पैक्यात टी त्यांचा, संसार फुलविणार,
काही स्वप्ने त्याची होते, काही स्वप्ने तिचीही होती,
संसार फुलविताना. त्यांची तगमग होत होती ।।१।।
ह्या संसाराच्या वेलीवरती, फुलले एक फुल,
त्यांच्या पदरी आता एक, होते गोंडस मूल,
सरला वसंत ऋतू, आता पावसाळा आला,
सांगे अडचणींच, वादळ घेऊन आला ।।२ ।।
तो धीट खंबीर, वादळात उभा राहिला,
त्याला टेकू, तिच्या खंबीर साथीचा लाभला,
या वादळातून त्यांची, संसाराची नाव तारली,
त्या दोघांना, एकत्र आणून गेली ।। ३।।
ना उरली त्याची स्वप्ने, ना तिची स्वप्ने वेगळी उरली,
त्या दोघांच्या संसाराची स्वप्ने त्यांनी, आता एकत्र पाहिली,
तो संसाराचा राजा, ती त्याच्या मनाची राणी,
दोघांच्या संसाराची, छोटीशी ही कहाणी ।। ३ ।।

बायको

तिचं वागणं असो कि बोलणं असो,
दिसणं असो, कि विचार असो,
आपल्यासाठी तो नेहमी, चेष्टेचा विषय असतो,
बायको हा नेहमी, चेष्टेचा का विषय असतो ?  ।। १ ।।
नवीन पिढी घडवणारी, 'ती' आई असते,
घराला घरपण देणारी, 'ती' गृहलक्ष्मी असते,
आई सून कर्तव्य निभावताना, बायको ही बायको असते,
तरी बायको हा नेहमी, चेष्टेचा का विषय असतो? ।।२।।
एकदाच तुमच्या नावापुढे, बायकोचं नाव लावून बघा,
स्वता:च्या अस्तित्वाला, एकदा धक्का देऊन बघा,
लक्षात येईल बायको हा, चेष्टेचा विषय नसतो,
तो मानाचा, प्रेमाचा, आयुष्यभराचा जोडीदार असतो ।।३ ।। 

सूर्यास्त - २

सूर्य अस्ताला निघाला, खेळ लाटांचा मंदावला, का अशावेळी खुणावते, अनामिक ओढ ही मनाला... ओढ अशी ही लागते, मन बेचैन असे हे होते, जसे ओळखीचे कोणी,...