Thursday, September 20, 2012

कविता

कविता ही प्रतिभा असते, कवी म्हणवणाऱ्या लोकांची,
शब्दांचा काव्य बनतं, ही देणगी आहे देवाची|

आयुष्याला अर्थ देते, देते दिशा जगण्याला,
लंगड्यालाही पाय देते, आयुष्याच्या शर्यतीत धावायला|

देते दृष्टी कवीला, सूर्याच्या पलीकडे पहायला,
शिकविते रडता रडता हसायला, आणि हसत हसत दुख भोगायला|

कधी काव्य असतं पावसाचं, प्रेमाच्या धारांनी मन चिंब भिजवणार,
कधी काव्य असतं पावसाचं, मनातलं दुख डोळ्यावाटे पूर म्हणून वाहणारं|

कविता ही अशीच असते, आयुष्यावर बोलणारी, 
शब्दांच्या माध्यामातून, मुक्यालाही बोलायला लावणारी|

Sunday, September 9, 2012

खट्याळ....

खट्याळ वारा...
अलगद अलगुज वाजवीत जातो, 
मनातील गुज तुला सांगून जातो....खट्याळ वारा....|

खट्याळ पाउस...
प्रेमाच्या धारा बरसत जातो,
भावनांनी चिंब भिजवून जातो....खट्याळ पाउस ...|

खट्याळ हसणं.....
मनास वेड लाऊन जातं,
जीवाची घालमेल वाढवून जातं....खट्याळ हसणं.....|

Saturday, July 14, 2012

सखे ग.....

सांगायचं राहूनच गेलं, सखे तुला मनातलं, 
ओठांवरती येउन सुद्धा , ओठातच राहिलेलं |

रेखा उमटल्या प्रेमाच्या, भावनांचे रंग भरले, 
मनातले चित्र कसे, अलगद उमटत गेले,
जे व्यक्त व्हायचं होतं, ते मात्र राहूनच गेलं,
पूर्ण होऊनही हे चित्र, थोडसं अपुरच राहिलं,
सांगायचं राहूनच गेलं, सखे तुला मनातलं, 
ओठांवरती येउन सुद्धा , ओठातच राहिलेलं || १ ||

कधी तरी होईल पूर्ण, चित्र माझ्या मनातलं,
कधी तरी कळेल तुला,प्रेम माझ्या मनातलं,
तेंव्हा म्हणेन सखे जे, सांगायचं ते सांगू झालं,
ओठांवरती राहिलेलं, डोळ्यातुनी व्यक्त झालं ,
जरा थांब, समजून घे, येउदे ऋतू वसंताचा,
दाही दिशा पसरून जाईल, सुगंध आपल्या प्रेमाचा|| 2 ||

Tuesday, July 10, 2012

ती संध्याकाळ .............

A small, sweet and romantic poem of memories of a lover with his girlfriend; an evening on a beach...hope you guys like it... do leave your  comments, these will inspire me to write more for sure...


किनाऱ्यावरच्या आपल्या पाऊलखुणा लाटांनी पुसून टाकणं ;

आणि मग उगाचच लाटांनी किनाऱ्यावरच  रेंगाळणं ;
त्यावर तुझं ते रुसणं , आणि माझं हसणं , अजूनही माझ्या लक्षात आहे ,
समुद्रावरची ती संध्याकाळ अजूनही माझ्या लक्षात आहे  || १  ||

मावळणारा सूर्य जणू आपला निरोप  घेत होता ,
मंद वाहणारा वारा तुझ्या बटांशी खेळत होता ,
त्यावर तूझं ते रुसणं आणि माझं हसणं ;अजूनही माझ्या लक्षात आहे ,
समुद्रावरची ती संध्याकाळ अजूनही माझ्या लक्षात आहे  || २  ||

समुद्रावरच्या गर्दीतही आपण दोघे एकांतात होतो ,
गुंतवूनी हातात हात , प्रेमाची स्वप्ने रंगवत होतो ,
तुझा तो स्पर्श , आपली स्वप्ने , अजूनही माझ्या लक्षात आहे , 
समुद्रावरची ती संध्याकाळ अजूनही माझ्या लक्षात आहे  || ३  ||

संध्याकाळ सरत होती , तुझी तगमग वाढत होती ,
माझ्यापासून लांब जाण्याचा त्रास , नि घरी जाण्याची तुला घाई होती ,
तुझ्या चेहऱ्यावरचा तो गोंधळ अजूनही माझ्या लक्षात आहे ,
समुद्रावरची ती संध्याकाळ अजूनही माझ्या लक्षात आहे  ||  ४  ||

Tuesday, July 3, 2012

मन माझे



माझेच मन हे, मलाच कसे काय समजेना, उमजेना,
तुझ्यावीण सये कुठे ही मन हे गुंतेना, गुंतेना |

स्वप्नातीत भासणारी, श्रावणातली ही प्रसन्न हिरवळ, 
अखंड कोसळणाऱ्या सरींची, वर्षा  ऋतूतली मनास भुरळ,
परी चिंब भिजुनी, प्रेमाची ही तृष्णा काही शमेना,
तुझ्यावीण सये कुठे ही मन हे गुंतेना, गुंतेना | १ |

उंच आकाशी विहंग करिती, वे पक्ष्यांचे किती हे सुंदर,
त्यावरी आरूढ होऊनी तुझपाशी येण्यास मन हे झाले आतुर,
एक क्षणाचाही विरह आता मनास या करमेना,
तुझ्यावीण सये कुठे ही मन हे गुंतेना, गुंतेना | २ |

सायंकाळी कातरवेळी, नभी उमटली चंद्र कोर ही,
ढगाआढ ती लपून बसली, चंद्राची ती गोड चांदणी,
चांदणीशिवाय आकाशातल्या चंद्रालाही करमेना,
तुझ्यावीण सये कुठे ही मन हे गुंतेना, गुंतेना | 3 |


 --- विभव जोगळेकर 

पौर्णिमेच्या रात्री आकाशात अर्धाच चंद्र का?


                                                                || श्री ||
बाबरी मस्जिद निकाल, भारतातली तणावपूर्ण परिस्थिती, धर्मावरून भांडण, लोकांवर मत व्यक्त करण्यावर बंदी, ह्या परिस्थितीत मनातून सुचलेली कविता share करत आहे....आशा आहे आवडेल सर्वांना!


एक अखंड होत भारत वर्ष,
जिथे सिंधू, गंगा, यमुना एकत्र नांदत होत्या |
पण आता सिंधू, काश्मीर बघण्यावर मृत्यूच सावट का?
पौर्णिमेच्या रात्री आकाशात अर्धाच चंद्र का? || १ ||

याच भारत भूमीवर घेतले प्रभू विष्णूने दहा अवतार,
कित्येक दानवांचा इथे त्यांनी केला आहे संहार |
पण आता चहूकडे पसरलेल्या दानवाना दशावतार तरी पुरातील का?
पौर्णिमेच्या रात्री आकाशात अर्धाच चंद्र का? || २  ||

जिथे जगातील श्रेष्ट संस्कृती नांदत होती आनंदात,
जिथे अनेक धर्मांचे लोक एकत्र नांदत होते सुखात |
आज इथलेच धर्म एकमेकांच्या रक्ताला हपापलेले का?
पौर्णिमेच्या रात्री आकाशात अर्धाच चंद्र का? || ३  ||

सावट आहे इथे लोकांवरती अतिरेकी हल्ल्यांच,
साध्या निकालानंतर, उफाळणाऱ्या दंगलीच |
सतत मृत्युच्या छायेत वावरत जीवनाचा आनंद उपभोगायचा का?
पौर्णिमेच्या रात्री आकाशात अर्धाच चंद्र का? || ४  ||

लोकतांत्रिक देशामध्ये लोकांवर मात्र अनेक बंधन आहेत,
बल्क एसमेस वर सुद्धा, सध्या तरी बंदी आहे |
स्वता:च मत मांडण्यावरसुद्धा इथे इतकी बंधने का?
पौर्णिमेच्या रात्री आकाशात अर्धाच चंद्र का? || ५ ||

लोकतंत्र देशात आपल्याकडे मतदानाचा अधिकार आहे,
चांगल्या नेत्यांना निवडून देण्याच प्रत्येकच कर्तव्य आहे |
देशाची अब्रू मातीत मिळवणाऱ्या, नेत्यांना थोडी तरी चाड आहे का?
पौर्णिमेच्या रात्री आकाशात अर्धाच चंद्र का? || ६ ||

नको वाटतंय चंद्राला भारतवर्षावरून जायला,
पापांच्या ज्वालांचा त्रास होतोय शीतल छाया देणाऱ्या चंद्राला |
पण मग असे असताना हे अर्धे तरी दर्शन का?
पौर्णिमेच्या रात्री आकाशात अर्धाच चंद्र का? || ७  ||

अजून आहे भारतवर्षात शिल्लक जात मानवाची,

ज्यांना आहे चाड आपल्या अस्तित्वाची, कर्तव्याची |

जरी वाहत असतील नद्या कर्म पापी दानवांच्या,

प्रयत्न चालू आहे भारतवर्षात माणुसकी टिकविण्याची |

अशा लढणाऱ्या मानवाला आशेच्या किरणांची गरज आहे,

म्हणूनच पौर्णिमेच्या रात्री आकाशात अजून अर्धा तरी चंद्र आहे || ८ ||

                                                                                         ..........विभव जोगळेकर...........

सूर्यास्त - २

सूर्य अस्ताला निघाला, खेळ लाटांचा मंदावला, का अशावेळी खुणावते, अनामिक ओढ ही मनाला... ओढ अशी ही लागते, मन बेचैन असे हे होते, जसे ओळखीचे कोणी,...