Thursday, April 14, 2016

मन फितूर फितूर..

तुझा आवाज ऐकण्या, कान हे आतुर,
डोळे लावून बसलो सखे, तुझ्या वाटेवर,
मन व्याकुळ व्याकुळ, मन आतुर आतुर,
हे माझे न रहाता, तुला फितूर फितूर ।। 

गालावर खळी, त्यावर विसावली बट,
मन व्यापून टाकते, तुझे गोड स्मित,
मिटता लोचने, का मनी हुरहूर, 
हे माझे न रहाता, तुला फितूर फितूर ।।

कधी घरी मी एकटा, किंवा मैफील दोस्तांची,
का सतत चालते, घालमेल ह्या जीवाची, 
का मनाला कायम तुझीच फिकीर, 
हे माझे न रहाता, तुला फितूर फितूर ।। 


सूर्यास्त - २

सूर्य अस्ताला निघाला, खेळ लाटांचा मंदावला, का अशावेळी खुणावते, अनामिक ओढ ही मनाला... ओढ अशी ही लागते, मन बेचैन असे हे होते, जसे ओळखीचे कोणी,...