Friday, December 26, 2014

अंतिम सत्य

तो समोर निपचिप पडला होता, श्वास थांबलेला,
आयुष्याचं अंतिम सत्य अनुभवून, सत्यापलीकडे गेलेला… 

नातेवाइक सारे कसे ओक्साबोक्शी रडत होते,
जमलेले लोक सारे, दु:खात त्यांच्या सहभागी होत होते,
आनंद, प्रेम, सु:ख दुखांच्या पलीकडे तो पोचलेला,
आयुष्याचं अंतिम सत्य अनुभवून, सत्यापलीकडे गेलेला… ।।१।।

आयुष्यात त्याने काय कमावलं, काय गमावलं, कळलं नाही,
अतृप्त राहिल्या इच्छा काही, पिंडाला कावळा शिवला नाही,
अर्ध्यावर संसाराचा डाव मोडून तो, अनंतात विलीन झालेला,
आयुष्याचं अंतिम सत्य अनुभवून, सत्यापलीकडे गेलेला… ।।२।।

प्रत्यक्ष नसला तरी आठवणीत आहे तो आता,
कधी मागच्या पडवीत झोपाळ्यावर अभंग गाणारा,
कधी शेतात रमलेला तर, कधी पान खाउन स्वतात रममाण झालेला,
आता आयुष्याचं अंतिम सत्य अनुभवून, सत्यापलीकडे गेलेला… ।।३।।

Tuesday, December 23, 2014

पाउस

कोसळणारा पाउस अनुभवताना,

 सुगंध मातीचा दरवळून गेला, 

वाऱ्यावेगे मनास माझ्या, 

भूतकाळात घेऊन गेला ।।


त्या रात्रीही असाच पाउस, 

दामिनीही संगतीला होती, 

मोगऱ्याची वेणी आणि, 

मोरपंखी साडी तू नेसाली होतीस ।।


पौर्णिमेच्या चंद्रापरी, 

काया तुझी चमकत होती, 

गालावर विसावलेली बट तुझी, 

मनास माझ्या खुणावत होती ।।  


चिंब भिजलेली काया, 

साडीही तुला बिलगून होती,

चिंब पावसातही मनात, 

तहानलेली प्रीत होती ।।

सूर्यास्त - २

सूर्य अस्ताला निघाला, खेळ लाटांचा मंदावला, का अशावेळी खुणावते, अनामिक ओढ ही मनाला... ओढ अशी ही लागते, मन बेचैन असे हे होते, जसे ओळखीचे कोणी,...