Tuesday, June 10, 2014

मागे वळून पाहू

चल ग सखे आज जरा मागे वळून पाहू,
पाच वर्षांचा संसार आपला, आठवणीत डुंबून जाउ… 




ती पहिली भेट, तो मनातील संकोच,जरा पुन्हा अनुभवू…
तो पहिला स्पर्श आणि तुझ लाजणं, कसं मनाला सांभाळू… ।।१।।



तो पहिला पाउस, ती पाहीली मिठी,जरा पुन्हा अनुभवू…
ते फोनवरच तासंतास बोलणं,थोडं पुन्हा बोलून पाहु… ।।२।।


ते रुसवे, फुगवे नि ते अबोल क्षण ,यांना दूर लोटून देऊ,
त्या नंतरचं खळखळून हसणं,पुन्हा हसून पाहू…. ।।३।।

चल ग सखे आज जरा मागे वळून पाहू,

पाच वर्षांचा संसार आपला, आठवणीत डुंबून जाउ…

मी माझ्याच तंद्रीत…

मी माझ्याच तंद्रीत, अनवाणी, पायवाट तुडवीत चाललो होतो,
बेभान, बेफिकीर मी, माझ्याच मस्तीत चाललो होतो… 

 नाही चिंता, नाही फिकीर, नाही तमा कुणाची,
पायावाटेच्या वळणावळणावर, पावलं टाकीत चाललो होतो… 
एकीकडे पसरलेला अथांग सागर होता…तर… 
दुसऱ्या बाजूने, डोंगराच्या पायथ्याशी, संथ वाहणारी सरिता… 
आजही पुन्हा त्या सागरावरच्या, सुर्यास्ताचा मी साक्षी होतो,
मी माझ्याच तंद्रीत, अनवाणी, पायवाट तुडवीत चाललो होतो…. ।१।

मनाला माझ्या पसरलेल्या अथांग सागराची ओढ होती,
पावलांनी मात्र, घराकडे जाणारी, पायवाट धरली होती,
सायंकाळच्या त्या संधीप्रकाशात, निसर्गाच्या कुशीत हरवलो होतो,
मी माझ्याच तंद्रीत, अनवाणी, पायवाट तुडवीत चाललो होतो…।२।





पक्षांचे थवे घरी परतताना, मी निरोप त्यांचा घेत होतो,
आकाशातल्या रंगांच्या छटा, डोळ्यात साठवून घेत होतो,
स्वता:शी संवाद साधण्यासाठी, उद्या परत यायचं पक्कं करत होतो,
मी माझ्याच तंद्रीत, अनवाणी, पायवाट तुडवीत चाललो होतो…. ।३।

सूर्यास्त - २

सूर्य अस्ताला निघाला, खेळ लाटांचा मंदावला, का अशावेळी खुणावते, अनामिक ओढ ही मनाला... ओढ अशी ही लागते, मन बेचैन असे हे होते, जसे ओळखीचे कोणी,...