Friday, December 19, 2025

मन असेच असते हे..

आता होतो कोकणात, सुंदर सुंदर वनात 
आता गेलो काठी गंगेच्या, बसलो गार पाण्यात 

मन असेच आपले हे, शहारले माझे अंग 
मन असेच आपले हे, होउन जाते दंग 

कधी असते गोव्यात, समुद्र किनारी 
कधी येते वाडीत, रम्य नदीकिनारी

मन असेच आपले हे....

बसलो घराच्या खिडकीत , तरी आहे बाबांसोबत
जाणवली नसली तरीही, आठवते आजोबांची संगत

मन असेच आपले हे....

कधी म्हणत जाते परदेशी, पण येते परत मायदेशी 
कुठेही गेलो तरी परत येईन, ही गाठ आहे मनाशी 

मन असेच आपले हे....

पुढे काय होणार, आधी काय होते 
याचाच जास्त विचार, मन करत बसते 

मन असेच आपले हे....

मन आहे जिथे आता,  तिथे प्रत्यक्षात जाणे 
चांगल्या मार्गाने, उच्च स्थानावर पोहोचणे 
आयुष्याचे हेच ध्येय, सांगा तुम्ही मनाला 
जरा खोल विचार करू दे, आपल्या मनाला

मन असेच असते हे.....


 ----- नहुष जोगळेकर 

सूर्यास्त - २

सूर्य अस्ताला निघाला, खेळ लाटांचा मंदावला, का अशावेळी खुणावते, अनामिक ओढ ही मनाला... ओढ अशी ही लागते, मन बेचैन असे हे होते, जसे ओळखीचे कोणी,...