Sunday, December 15, 2013

माझे… तुझे…


जे माझ्या मनात,  ते तुझ्या ओठांत,
काय चालले हे आपुल्या  दोघांत..

प्रीतीचा सडा अंगणी, माझिया मनात,
प्रेम बहरून  आले,तुझ्या नजरेत.. 

दु:ख विरहाचे, दाटे ह्या ह्रुदयात,
आसवे का येती, तुझीया डोळ्यांत..

मुक्या भावनांना  बोल कोठून हे आले,
न जाणो माझे मन, कधी तुझ्यात गुंतले...

सूर्यास्त - २

सूर्य अस्ताला निघाला, खेळ लाटांचा मंदावला, का अशावेळी खुणावते, अनामिक ओढ ही मनाला... ओढ अशी ही लागते, मन बेचैन असे हे होते, जसे ओळखीचे कोणी,...