Wednesday, May 8, 2013

प्रेम …

हे तुझं, ते माझं, कधी आपलं झालं कळलंच नाही,
प्रेमाच्या आपल्या संसाराला, चार वर्ष झाली कळलीच नाही ॥ 

चारच दिवसांपूर्वी तर भेटलो आपण,
लग्न केलं, प्रेमात पडलो,
कि प्रेमात पडून लग्न केलं,
अजूनही मला उमगत नाही …. 
प्रेमाच्या आपल्या संसाराला, चार वर्ष झाली कळलीच नाही ॥ 

चारच पाउलं तर चाललो आपण,
दोन धडपडण्याची, नि दोन पाउलं प्रेमाची होती,
तुझयासंगे ही चार पाउलं,
कधी चाललो कळलंच नाहि …
प्रेमाच्या आपल्या संसाराला, चार वर्ष झाली कळलीच नाही ॥ 

चारच क्षण तर जगलोय आपण,
एक क्षण दुख्खाचा, तर तीन क्षण प्रेमाचे होते,
यापुढील प्रत्येक क्षण प्रेमाचाच असेल शंकाच नाही …. 
प्रेमाच्या आपल्या संसाराला, चार वर्ष झाली कळलीच नाही ॥ 

सूर्यास्त - २

सूर्य अस्ताला निघाला, खेळ लाटांचा मंदावला, का अशावेळी खुणावते, अनामिक ओढ ही मनाला... ओढ अशी ही लागते, मन बेचैन असे हे होते, जसे ओळखीचे कोणी,...